कोरेगाव भीमा येथे आज स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना पक्षाची स्थापना – पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशसिंह ढेरंगे यांची घोषणा

485

 कोरेगाव भीमा,शिरूर : ( सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे आज स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना पक्षाची स्थापना करण्यात आली. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार व विद्यार्थी वर्गाला भेडसावणाऱ्या समस्यांचा व जनतेचा आवाज राज्य सरकारी व देशपातळीवर उठविण्यासाठी  या पक्षाची स्थापना करत असल्याचे कोरेगाव भीमा,ता. शिरूर येथील पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशसिंह देवराम ढेरंगे यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथे स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना या नवोदित पक्षाच्या नामफलक व शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोरेगाव भीमाचे माजी सरपंच आबासाहेब गव्हाणे होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सचिव अमीर इनामदार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय गव्हाणे, उपाध्यक्ष रामभाऊ ढेरंगे आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना राजेश ढेरंगे यांनी सांगितले की, लवकरच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार वर्गाला समजावीत यासाठी महाराष्ट्र भर दौरा आयोजित करणार असून या माध्यमातून जनतेला भेडणाऱ्या समस्या शासन दरबारी मांडणार असल्याचे ढेरंगे यांनी यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बबूशा ढेरंगे, राहुल ढेरंगे, माजी उपसरपंच नितीन गव्हाणे, शिवव्याख्याते गणेश फरताळे, माजी सरपंच संदीप ढेरंगे, तानाजी ढेरंगे, सुधाकर ढेरंगे, शौकत इनामदार, हरीचंद्र ढेरंगे, सुनील ढेरंगे, निखिल परदेशी, सुनील भालेराव, सूरज ढेरंगे, कांतीलाल फडतरे, सूरज घोगरे, आकाश ढेरंगे, माऊली नाबगे, एकनाथ तांबे, सतीश भंडारे, संदीप गव्हाणे, सचिन परदेशी, सचिन साळुंके, जितेंद्र आचार्य, प्रवीण शिंदे, शांताराम शिवले, सतीश फडतरे, ऍड. सचिन गव्हाणे, विशाल कोतवाल, किरण ढेरंगे, मंगेश निकरट, अजित ढेरंगे, सारंग चकोर, अमित साळुंके, संदेश खुळे, राहुल गव्हाणे, अभिषेक वागस्कर, अजित गुंडाळ, बळीराम गुंडाळ, सुभाष शिवले, नितीन राऊत, अनिल कुंभार, प्रकाश माळी, पोपट शिवले, सच्छिदानंद कडलग आदी मान्यवर व स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मधुकर कंद यांनी सूत्रसंचालन पार्थ नानेकर यांनी तर आभार अमीर इनामदार यांनी मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *