सेवा निवृत्त अधिकारी ज्ञानदेव बापूराव लोखंडे यांचे निधन 

396

           रांजणगाव गणपती,शिरूर : ( सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरुर तालुक्यातील कर्डे येथील रहिवासी व महाराष्ट्र शासनाच्या मृदसंधारण विभागातील सेवा निवृत्त अधिकारी ज्ञानदेव बापूराव लोखंडे (वय ७८) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.ज्येष्ठ अण्णा हजारे यांच्या पाणलोट क्षेत्राखालील पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेत सहभागी होऊन अतिशय उत्कृष्ट काम केले होते.तसेच शिरूर तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत नालाबंडीगची कामे पारदर्शक पणे पार पाडण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.
त्यांचे पश्चात दोन मुले,दोन  विवाहित मुली,सुना व नातवंडे असा परिवार आहे.सॉफ्टवेअर इंजिनिअर किशोर लोखंडे व शिरूर येथील व्यावसायिक मनोज लोखंडे हे त्यांचे पुत्र होत. पुण्यातील एसएसपीएमएस महाविद्यालयातील प्राध्यापक नामदेव सरोदे हे त्यांचे भाचे होत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *