अकोला जिल्ह्यात कामगार कायद्याच्या विरोधात कामगार संघटनांनी दिले निवेदन – जिल्हाभरात ठिकठिकाणी निदर्शने व निवेदने

370
          पातूर,अकोला : (प्रतिनिधी,श्रीधर लाड – अकोला जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या सुधारित श्रमिक कायदा अध्यादेश व कामगारांच्या प्रलंबित समस्यांच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व कामगार संघटनानी गुरुवारी संयुक्तपणे एक दिवसीय देशव्यापी बंद मध्ये सहभाग घेत जिल्हाभरात ठिकठिकाणी निदर्शने करीत केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला.
         काळा श्रमिक अध्यादेश रद्द करून श्रमिकांचे पूर्ववत कामाचे तास व अन्य लाभ सुरू करण्यात यावे,सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण रद्द करावे,कर्मचाऱ्यांच्या पेंशन सवलती सुरू कराव्यात.केंद्र सरकारने कामगार विश्व संपविण्याचे कट कारस्थान थांबवून हा कायदा रद्द करावा आदी मागण्यासाठी सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन जिल्हास्तरीय कृती समिती स्थापित केली होती.या अनुषंगाने सर्व कामगार संघटना व संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून आपला निषेध व्यक्त केला. करोना संकटामुळे देशभरातील कामगार विस्थापित झाला असून त्याच्या समोर रोजगाराचा नवा प्रश्न उभा राहिला आहे.                 केंद्र सरकार कामगारांच्या हक्कावर गदा आणीत असून त्यांच्या शोषणाचे कायदे तयार करीत आहे.म्हणून जिल्ह्यातील सर्व कामगार संघटनांच्या व कामगार संस्थांच्या कामगारांनी या बंद मध्ये सहभाग घेत आपला जोरदार निषेध व्यक्त केला.स्थानीय जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकत्र येऊन केंद्र सरकारच्या या धोरण विरोधात घोषणा देण्यात आल्यात.तर सर्व तालुका पातळीवर ही तहसीलदार यांना निवेदने देण्यात आली.केंद्र सरकार जो पर्यंत हे काळे कामगार बिल रद्द करणार नाही तो पर्यंत असहकार आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा संयुक्त कामगार कृती समितीचे निमंत्रक,इंटक नेते प्रदीप  वखारिया यांनी यावेळी दिला.
              जिल्हाधिकारी यांना या निवेदन देताना कामगार कृती समितीचे प्रदीप वखरिया, कॉ.एस एन गोपनारायान,कॉ.टी एम गवळी,कॉ,देवराव पाटील हागे, राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी संघाचे नेते राजेंद्र नेरकर,राजन गावंडे,मनीष श्रावगी,प्रशांत मेश्राम ,सुमंत आवळे,राहुल थोटांगे,संजय राऊत,पी बी भातकुले,अनुप खरारे,बी के मनवर,ज्योती धस समवेत इंटक,सिटू,आयटक,भारतीय कामगार सेना,श्रमिक एकता महासंघ, टीयूसीसी,एआयटीयु सीसी,युटीसिसी, ऑटो चालक संघटना,एस टी कामगार संघटना,बँक एम्प्लॉइज असो.घरेलु महिला संघ,असंघटित बांधकाम मजूर संघटनाचे पदाधिकारी व कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *