कवठे येमाई येथे सायकल मॅरेथॉन स्पर्धा संपन्न ; पन्नास स्पर्धकांचा सहभाग 

1275


शिरूर, पुणे (देवकीनंदनं शेटे, संपादक) : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे येस क्लबच्या वतीने सायकल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कवठे येमाई येथील माळी-मळा कमान ते फत्तेश्वर कमान अशी ४ कि.मी. अंतराची स्पर्धा ठेवण्यात आली होती. सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी स्पर्धेची सुरवात क्लब चे अध्यक्ष नवनाथ सांडभोर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आली. वाहनांच्या वापरामुळे वाढणारे प्रदूषण आटोक्यात यावे तसेच सायकलचा वापर वाढवा, मानवी आरोग्य  सुधारावे या हेतूने येस क्लबच्या वतीने सायकल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेमध्ये ५० मुलांनी सहभाग घेतला होता. भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले, तर पहिल्या चार मध्ये आलेल्या विजेत्यांना सन्मान चिन्ह व रोख रक्कम असे बक्षीस देण्यात आले.

यावेळी क्लबचे उपाध्यक्ष डॉ.संतोष उचाळे  म्हणाले, “सायकल हि केवळ प्रदर्शनाची बाब नसून, ती एक आरोग्यदायी जीवनाचा मार्ग आहे. संतुलित आहार व सातत्यपूर्ण व्ययाम हि सुदृढ व आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. सायकलचा वापर वाढल्यास नक्कीच आरोग्याच्या समस्या कमी होतील.” स्पर्धा संपल्यानंतर स्पर्धकांनी फत्तेश्वर मंदिर येथे अल्पआहाराचा आनंद घेतला. स्पर्धा यशस्वी संपन्न होण्यासाठी येस क्लबच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *