पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी राहुल सातव

339

           कोरेगाव भीमा,शिरूर : (प्रतिनिधी,गजानन गव्हाणे) – वाघोली, ता. हवेली येथील राहुल तुकाराम सातव यांची नुकतीच पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे यांचे हस्ते व राजाभाऊ पवार यांच्या उपस्थितीत त्यांना देण्यात आले.
सर्वसामान्य नागरिक व पोलीस यांच्यातील दुवा बनून सर्वसामान्य लोकांचे प्रश्न पोलीस यंत्रणेसमोर मांडण्यास सदर संस्था काम करत असते. तसेच विविध गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल देखील पोलीस बांधवांचे मनोबल वाढविण्याचे काम असोसिएशनचे च्या वतीने करण्यात येते. मागील चार वर्षांपासून असोसिएशनच्या माध्यमातून पोलीस बांधवांबद्दल समाजात आस्था प्रेम वाढावे यासाठी प्रयत्न करत असून विविध गुन्ह्याची उकल करणाऱ्या पोलिसांना शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असल्याचे चिंचवडे यांनी सांगितले. तसेच दरवर्षी पोलिसांसाठी आरोग्य शिबीर, पोलीस वसाहत स्वछता आदी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे गजानन चिंचवडे यांनी यावेळी सांगितले. तर पुणे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला सर्वतोपरी सहकार्य करून पोलीस व सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये सुसंवाद साधून पोलिसांबद्दल प्रेम आस्था व आपुलकी वाढावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष राहुल सातव यांनी सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *