ग्राहक कल्याण फाउंडेशन हवेली तालूका पूर्व विभाग उपाध्यक्ष पदी थेऊर येथील कविता शेडगे यांची निवड  

341

   कोरेगाव भीमा,शिरूर : (प्रतिनिधी,गजानन गव्हाणे) – ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या हवेली तालुका पूर्व विभाग उपाध्यक्ष पदी थेऊर येथील कविता शेडगे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र फाउंडेशन चे हवेली तालुकाध्यक्ष सुनील थोरात यांच्या हस्ते देण्यात आले.
ही निवड राज्य सदस्य अस्लम तांबोळी, जिल्हा अध्यक्ष संतोष काकडे, जिल्हा सदस्य व शर्ती. पोपट साठे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली. या प्रसंगी राज्य कार्यवाह सतीश साकोरे, राज्य सदस्य अस्लम तांबोळी, राज्य प्रसिध्दी प्रमुख चिंतामणी गिरमकर, सदस्य उत्तम झेंडे, पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष आबा काकडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व साथ मराठी संचालक धनराज खंडाळे, सदस्य पोपट साठे, पुरंदर अध्यक्ष रामदास मेमाणे, सचिव सुभाष काळे व हवेली तालुका ग्राहक कल्याण फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते.
गेली दहा वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व इतर कार्यात असलेल्या भरघोस योगदानाबद्दल यांची निवड करण्यात आली. तसेच भविष्यात ग्राहक कल्याण फाउंडेशन च्या माध्यमातून आरोग्य, विद्युत, शैक्षणिक क्षेत्रात नागरिकांना काही समस्या निर्माण झाल्यास त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पूर्व हवेली विभाग उपाध्यक्षा कविता शेडगे यांनी सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *