पातूर तालुक्यातील तेवीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी चारशे कर्मचारी

346
पातूर, अकोला (-प्रतिनिधी,श्रीधर लाड) : जानेवारी महिन्यात होणाऱ्या अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तेवीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी चारशे कर्मचारी, अधिकारी इलेक्शन मोडवर आले आहेत. अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील कार्यकाळ संपलेल्या 23 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला आहे. त्यामुळे चारशे कर्मचाऱ्यांना शनिवारी-रविवारी दोन दिवस प्रथम प्रशिक्षण देण्यात आले. पातुर तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी दीपक बाजड यांच्या मार्गदर्शनामध्ये निवडणूक नायब तहसीलदार विजय खेडकर, नायब तहसीलदार सय्यद ऐहसानोद्दीन यांनी निवडणूक प्रक्रिया कशी राबवावी याबाबत कर्मचाऱ्यांना विस्तृत मार्गदर्शन केले. मतदान केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी प्रत्यक्षात ईव्हीएम मशीन कशी हाताळावी याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षित व्यक्तीकडून दाखवण्यात आले. दर दोन तासाला मतदानाची टक्केवारी देणे मतदान केंद्राध्यक्ष कामे आपल्या डायरीत नोंद घेणे मतदान सुरू होण्यापूर्वीचे आणि मतदान संपन्न या पूर्वीचे घोषणा पत्र कसे भरावे मतदान पूर्वतयारी आणि मतदानानंतर ची तयारी याबाबतचे कर्तव्य केंद्राध्यक्ष यांना समजून सांगण्यात आले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी 96 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले ती यंत्रणा सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी नऊ झोनल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली. गेल्या दोन दिवसांमध्ये शनिवारी 200 आणि रविवारी 200 असे चारशे कर्मचारी यांना निवडणूक प्रशिक्षण देण्यात आले. तालुक्याची 23 गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया निवडणूक अधिकारी दीपक बाजड, निवडणूक नायब तहसीलदार विजय खेडकर नायब तहसीलदार सय्यद एहसानोद्दिन पार पाडत आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *