महिला अन्याय मंचाच्या संस्थापक अध्यक्षा प्रीती चव्हाण यांच्या वतीने ऊसतोडणी मजुरांना अन्नधान्य वाटप

399

कोरेगाव भीमा,ता.शिरूर (-प्रतिनिधी, गजानन गव्हाणे) : महिला अन्याय मुक्ती मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा प्रिती सोमनाथ चव्हाण यांच्या वतीने नुकतेच वढू बुद्रुक, कोरेगाव भिमा येथील ऊस तोडणी कामगारांना अन्नधान्य, सॅनिटायझर, मास्क व मेडिक्लोअर चे वाटप करण्यात आले. तसेच महिला व लहान मुलांना साडी, कपडे व थंडीपासून वाचण्यासाठी स्वेटर देखील देण्यात आले. यावेळी बोलताना प्रीती चव्हाण यांनी या ऊसतोडणी कामगारांच्या समस्या जाणून घेताना आपली स्वछता, परिसर स्वच्छता तसेच कोरोना च्या काळात घरातील वृद्ध व लहान मुलांची कश्या प्रकारे काळजी घेता येईल या संदर्भात मार्गदर्शन केले. सध्या थंडीचा कडाका वाढल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी सामाजिक भान जपत गरीब, ऊसतोडणी मजूर, रस्त्यावर राहणारे लोक यांना आपल्या परीने चादरी, गरम कपडे, लहान मुलांचे कपडे व साड्या देण्याचे आवाहन यावेळी केले. अनेकांच्या हातचे काम गेल्याने आज ही काही लोकांच्या घरची चूल पेटत नाही अश्या लोकांना समाजातील लोकांनी काही दिवस पुरेल इतके धान्य व इतर संसार उपयोगी वस्तू दिल्या पाहिजेत. तसेच महिला अन्याय मंच मागील अनेक महिन्यांपासून समाजातील गरजवंत लोकांच्या पाठीशी उभा आहे. त्याच प्रमाणे नागरिकांनी देखील उभे रहावे असे आवाहन यावेळी प्रीती चव्हाण यांनी केले. यावेळी उपस्थित महिला अन्याय मुक्ती मंच महाराष्ट्र राज्य सचिव राजश्री पवार, उपाध्यक्षा सायली चव्हाण, करंदीच्या सरपंच ललिता सुभाष शिंदे, अजय भोसले तसेच निरीक्षक सल्लागार सोमनाथ चव्हाण आदी उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *