वाजेवाडी च्या उपसरपंचपदी भारती लोहोट बिनविरोध

368
कोरेगाव भीमा,ता.शिरूर (-प्रतिनिधी, गजानन गव्हाणे) : शिरूर तालुक्यातील वाजेवाडी येथील ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी नुकतीच भारती शंकरराव लोहोट यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच देविदास भोर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मोहन शिवाजी वाजे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक दिलीप पानसरे यांनी काम पाहिले.
          यावेळी माजी सरपंच रंगनाथ वाजे, धर्मराज वाजे, विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष शिवाजी भोंडवे, संतोष भोंडवे, प्रा. नानासाहेब वाजे, माजी उपसरपंच अमित सोनवणे, गोपीचंद भोंडवे, सुनील वाजे, दत्तोबा भोंडवे, भरत भोंडवे, हरीश वाजे, प्रशांत भोंडवे, जगदीश तिखे, शामराव तिखे, आण्णा मांजरे, राजेंद्र मांजरे, सोपान लोहोट, शशिकांत लोहोट, दिलीप लोहोट, रामदास लोहोट, किसन वाजे, सतीश शिंदे व विद्यमान व माजी ग्रामपंचायत पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
         उपसरपंच पदासाठी पद्मावती ग्रामविकास पॅनेलच्या वतीने भारती लोहोट यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोरोना च्या पार्श्वभूमीवर भारती लोहोट यांचा हार घालून सत्कार करण्यात आला. निवडीच्या नंतर भारती लोहोट यांनी गावातील शाळा, रस्ते यांच्या सुधारणे बरोबरच ग्रामस्वच्छता, शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजना गावात व वाड्यावस्त्यांवर प्रामुख्याने राबविण्यात येणार असल्याचे सांगताना नागरिकांनी देखील कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल  डिस्टनसिंग पाळत, मास्क व सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन यावेळी नागरिकांना केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *