मुरबाड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीच्या निवडणूक जाहीर ; निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज तर राजकिय पक्षांच्या गतीविधींना वेग

457
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील 44 ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहिर झाल्या असून, निवडणूकीसाठी निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे. तर  ग्रामपंचायतीवर राजकिय वर्चस्व मिळवण्यासाठी राजकिय पक्ष कामाला लागले आहेत. मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक पहिल्यांदाच चुरशीच्या होणार असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप व आरपीआय (आठवले) अशी पहिल्यांदा च चुरस पहायला मिळणार आहे. तर महाविकास आघाडीचे मित्र पक्ष आरपीआय सेक्यु ही या रिंगणात आहे. वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी हे पक्ष ही या वेळी निवडणूकीची रंगत वाढविण्यासाठी तयार आहेत. शहरी भागात दबदबा निर्माण करणारा मनसे ही ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत निवडणूकीत अस्तित्वाची लढाई लढणार आहे.
 तालुक्यातील  करवेळे, शिरगाव, शिदगाव, मासले, शिरवली, मानिवली (शी), शेलारी, भुवन, खांदारे, शिवळे, माल्हेंड, नागाव, कान्हार्ले, मोहोप, खांडपे, बोरगाव, उचले,नारीवली,  आंबेटेंभे ,  आगाशी ,  गवाळी ,  चिरड ,  केदूर्ली ,  आंबेगाव ,  असोसे ,  वाघिवली ,  पोटगाव ,  धानिवली ,  देवपे ,  फणसोली ,  खाटेघर ,  कलमखांडे ,  कोंडेसाखरे ,  देहनोली ,  तुळई,विढे,सरळगाव, मानिवली (बु), देहरी, बांधीवली, खानिवरे, जांभूर्डे, म्हसा, पाटगाव या ग्रामपंचायत च्या निवडणूका जाहीर झाल्या असून,अनेक ग्रामपंचायत मध्ये मागील राजकिय समिकरणा नुसार भाजप शिवसेना युतीचे वर्चस्व होते तर आत्ता शिवसेना ही महाविकास आघाडीत असल्याने भाजप विरुद्ध शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची ही लढत होणार आहे.  त्यामुळे सत्तेच्या राजकारणा त सर्वच पक्ष आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी कामाला लागले आहे महाविकास आघाडी तील प्रमुख नेतृत्वाची धुरा शिवसेनेचे सुभाष पवार व कांतीलाल कंटे, राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव व राजेश सासे तर काँग्रेसची धुरा दयानंद चोरगे व कृष्णकांत तुपे यांच्यावर आहे. तर मुरबाड मध्ये भाजपचे वर्चस्व असल्याने ठाणे जिल्हा भाजपाध्यक्ष व आमदार किसन कथोरे व तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव यांचा या निवडणुकीत कस लागणार आहे. त्यात मनसे ही गावागावात पोहचली असल्याने महाविकास आघाडी व भाजप यांना आव्हान निर्माण करू शकते. कारण मनसे कडे तरुण वर्ग मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे जाहीर झालेल्या 44 ग्रामपंचायत निवडणूकीवर मुरबाड तालुक्यातील राजकीय पक्षाची भिस्त समजणार आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *