मुरबाड आरोग्य विभाग व पंचायत समितीला टाळे ; कोरोना बाधित कर्मचारी आढळल्याने केले कार्यालय बंद

720

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील कोरोना बधितांच्या संख्येत लक्षणीय घट होत असताना मुरबाड पंचायत समितीच्या आरोग्य विभागातच कोरोना बाधित कर्मचारी आज आढळून आल्याने, मुरबाड पंचायत समितीची व आरोग्य विभागाची इमारतीला सुरक्षेचा उपाय म्हणून टाळे ठोकण्यात आले आहे. मुरबाड तालुक्यात जेव्हा कोरोना बधितांची संख्या वाढत असताना पंचायत समिती व सर्व आरोग्य यंत्रणा सुरक्षा उपाय करत असल्याचे कोरोनाच्या संकटापासून दूर होते. मात्र आता तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या निरंक होत असताना शहरात असलेल्या पंचायत समिती व आरोग्य विभागाचा कर्मचाऱ्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. नुकताच मुरबाड नगरपंचायत ने अनेक महिने बंद असलेला आठवडे बाजार देखील सुरू केला आहे. आठवडे बाजारा लगतच पंचायत समिती व आरोग्य विभागाचे कार्यालय आहे. तर सदर कर्मचारी हा चतुर्थ श्रेणी चा असल्याने अनेक कर्मचाऱ्यांच्या सानिध्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून दोन्ही इमारती बंद केल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीधर बनसोडे यांनी सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *