मुरबाड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीत काँग्रेसला यश मिळवून देणार ; स्वगृही परतलेल्या दयानंद चोरगे यांचा विश्वास

502

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील काँग्रेस पक्षाला पुन्हा सुगीचे दिवस येतील तसेच आगामी ग्रामपंचायत व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश मिळेल असा विश्वास स्वगृही काँग्रेस मध्ये परतलेले भाजपचे माजी ठाणे जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारणी चे सेक्रेटरी दयानंद चोरगे यांनी मुरबाड मध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. भाजप मधील अंतर्गत बंडाळी ला कंटाळून आपण पुन्हा स्वगृही परतलो असून, भाजप ला सोडताना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे यांनी ही मला पक्षात येण्यासाठी आग्रह केला. पण मी स्वगृही परतलो, त्यामुळे पुन्हा काँग्रेस पक्षाला ठाणे जिल्ह्यात बळकटी देऊन काँग्रेस पक्षाचे वर्चस्व ग्रामपंचायत मध्ये निर्माण करणार असा विश्वास व्यक्त केला. भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष पद माझ्या कडे रहावे अशी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष व आमदार किसन कथोरे यांची इच्छा होती मात्र भाजपातील अंतर्गत बंडाळीत मला शह देण्यासाठी दबावतंत्र वापरून जिल्हाध्यक्ष पद कथोरे यांना देण्यात आले. पण अखेर भाजपातील काही नेत्यांच्या त्रासाला कंटाळून मी स्वगृही आलो. मागील काळात काँग्रेसमध्ये असताना व आता भाजपातील कामाचा अनुभव यामुळे मुरबाड सह ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात काँग्रेसला नवी उभारी देत आगामी येणाऱ्या नगरपंचायत, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत काँग्रेससाठी झटणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भिवंडी लोकसभेवर पुन्हा काँग्रेसचा झेंडा लावणार असा विश्वास ही व्यक्त केला. यावेळी मिशन 2024 समोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागा अशी सूचना ही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. यावेळी तालुकाध्यक्ष कृष्णकांत तुपे, शहराध्यक्ष योगेश गुज , परशुराम भोईर, शहापूर तालुका युवक अध्यक्ष देवेंद्र भेरे, मुरबाड तालुका महिला अध्यक्ष संध्याताई कदम, जुबेर पठाण, नरेश मोरे आदी  कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र गेल्या मागील निवडणूकीत कुठेही न दिसणारे काँग्रेसचे उमेदवार या ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात असल्याने पुन्हा काँग्रेस ठाणे जिल्ह्यात उभारी घेईल तर भाजपातील ही माझ्यावर विश्वास ठेवणारे अनेक मंडळी मला सहकार्य करतील असा विश्वास व्यक्त केला.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *