महात्मा गांधी विद्यालयात मरणोत्तर नेञदानाचा संकल्प ; 1990 सालच्या बॅच मधील विद्यार्थिनींचा उपक्रम 

512

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : महात्मा गांधी विद्यालयातील दहावीची 1990 सालच्या विद्यार्थिनींची बॅच उरळी कांचन येथे हळदीकुंकवाचे औचित्य साधत एकत्रित येत यावेळी मरणोत्तर नेञदानाचा संकल्प करुन फार्म भरले. संक्रांतीत हळदीकुंकू केल्यानंतर महिला भगिनी एकमेकींना वाण वाटत असतात. पंचायत समितीचे माजी सदस्या तथा नाट्य परिषदेचे शिरुर ता.अध्यक्षा दिपालीताई  शेळके म्हणाल्या  “हळदीकुंकवाला काहीतरी विशेष करावं असा आम्ही एकत्र येऊन ठरवलं, म्हणूनच आम्ही सर्वांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याचे महत्व आणि काळाची गरज याविषयी चर्चा केली आणि मरणोत्तर नेत्रदान करण्याचे फॉर्म भरले. प्रत्येकीने कमीत कमी परिचित किंवा नातेवाईकांचे पन्नास फॉर्म भरण्याचे ठरविले असून, सुरुवात मात्र स्वतःपासून केली.” यावेळी आतकीरे सुवर्णा, सुनिता कांचन,स्वाती शेटे, स्वाती भरमगुंडे, मनीषा भागवत, सुनिता डांगे, भारती राजपूत आणि मनिषा सप्तिस्कर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची संकल्पना दिपाली शेळके यांनी मांडली,तर प्रास्ताविक सुनिता कांचन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा अतकरे यांनी, तर आभार स्वाती भरमगुंडे यांनी मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *