वाढदिवसाच्या अवास्तव खर्चास फाटा – कवठे येमाईत मिठूलाल बाफणा (काका) यांचा विधायक कार्यास मदतीचा स्त्युत्य उपक्रम 

494

 शिरूर,पुणे : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाईचे माजी ग्रामपंचायत सदस्य,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व गावातील सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व जवाहरलाल (मिठूलाल) बाफणा काकायांनी आपला ६८ वा वाढदिवस अवास्तव खर्चास फाटा देत गावातील सामाजिक,विधायक व गरजुंना मदतीचा हात देत अत्यंत साधेपणात साजरा केला आहे. मिठूलाल काका आज ६८ व्या वर्षीही तरुणांना लाजवेल असे आरोग्य व शरीरयष्टी सांभाळत त्याच तारुण्यपूर्ण जोशात सामाजिक व विधायक कार्यात अग्रेसर रहात आहेत.त्यांची ही आरोग्यदायी वाटचाल त्यांचा नियमित शाकाहार,नियमित व्यायाम व शारीरिक हालचाल व सतत आनंदी राहण्याची त्यांची सवय हे असून त्यांनी वयाच्या ६८ व्या वाढदिवसी राबविलेला मदतीचा उपक्रम नक्कीच इतरांसाठी प्रेरणादाई व स्त्युत्य असाच आहे.

मिठूलाल काकांनी आपल्या ६८ व्या वाढदिवशी कवठे येथील जामा मशीद बांधकामासाठी ६०००,श्री फत्तेश्वर गोशाळेसाठी ३०००,स्वाती बोडरे यांना उपचारासाठी २०००,तर प्रामाणिकपणाचा प्रत्यय देणारा अविनाश हिलाळ यांस १००० रुपये भेट दिले. गावातील इतरही गरीब व गरजू कुटुंबाना त्यांनी आर्थिक मदतीचा हात दिला. त्यांच्या या उपक्रमाचे माजी आमदार पोपटराव गावडे,शिरूर पंचायत समितीचे कार्यकुशल सदस्य डॉ.सुभाष पोकळे व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *