मराठी भाषिक अधिकाऱ्यांच्या नियुक्तीने ग्राहकांमध्ये समाधान – कवठे येमाई कॅनरा बँकेत मिळतेय दर्जेदार सेवा – ग्राहकांचा ओघ वाढला 

663

 शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत विलीनीकरण झाल्यानंतर शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील कॅनरा बँकेत मागील २ महिन्यांपूर्वी अधिकारीच नसल्याने विस्कळीत झालेली सेवा आता या शाखेत मराठी भाषिक अधिकाऱ्यांच्या नियुक्तीने ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळत असून कामकाज ही सुरळीत होत असल्याने ग्राहकांतुन आता समाधान व्यक्त होत आहे. कवठे कॅनरा शाखेतून आता चांगली सेवा मिळु लागल्याने ग्राहकांचा ही ओघ वाढला असल्याचे पाहावयास मिळत आहे.

कवठे कॅनरा बँकेत मागील २ महिन्यांपूर्वी प्रज्ञा पवार (ताठे) या मराठी भाषिक व समजूतदार व ग्राहकांशी समन्वय साधत त्यांची कामे त्वरेने मार्गी लावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांची शाखाधिकारी म्हणून नियुक्ती झाली व येथील कॅनरा बँकेचे काम सुरळीत होण्यास सुरुवात झाली. ही शाखा ग्रामीण भागात असल्याने व्यापारी,संस्था,महिला बचत गट याबरोबर ८० टक्के ग्राहक हे शेतकरी आहेत. याच शाखेत संदीपान पवार,तौसिफ़ शेख,प्रताप वाहिले हे तीनच अधिकारी सेवक कार्यरत असून या शाखेत ग्राहकांची लेनदेन साठी होणारी गर्दी पाहता व कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी  बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी या शाखेत रिक्त असणाऱ्या जागेवर तात्काळ अधिकारी,कर्मचारी नियुक्त करण्याची गरज शिरूर पंचायत समितीचे सदस्य डॉ.सुभाष पोकळे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीणकुमार बाफणा,वैशाली रत्नपारखी,मधुकर रोकडे,मिठूलाल बाफणा,सनी (विशाल) रेणके,अनिकेत रेणके व ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.

शाखाधिकारी प्रज्ञा पवार (ताठे) यांनी आहे त्या कर्मच्यार्याच्या मदतीने ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा देण्याचा प्रयत्न सुरु केला असून बंद पडलेल्या ए टी एम ची सेवा ही सुरळीत सूरु केली आहे. येथील शाखेची कामकाजाची वेळ ११ ते ५ करण्यात आली असून या शाखेत नियुक्तीस असलेले मराठी भाषिक अधिकारी कर्मचारी बँक व ग्राहकांचे हित जोपासत शक्य तेव्हढी तत्पर सेवा देत असल्याने आता पुन्हा एकदा या शाखेत ग्राहकांचा मोठाच ओघ सूर झाल्याचे पाहावयास मिळत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *