आदित्य पवार सिद्धी होळकर ठरले शिरूर मल्ल सम्राट

279

विजेत्यांना मानाची चांदीची गदा बुलेट, रोख इनाम

निर्वी, ता.शिरूर (प्रतिनिधी, शकील मणियार) : पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ शिरूर तालुका कुस्तीगीर संघ अजिंक्यतारा प्रतिष्ठान व आंबळे- कळवंतवाडी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या शिरूर तालुका मल्ल सम्राट 2023 कुस्ती स्पर्धेत खुल्या गटातून अण्णापूर येथील आदित्य बबन पवार मल्ल सम्राट तर दहिवडी येथील कुलदीप इंगळे हा उपविजेता ठरला. महिला मल्ल सम्राट म्हणून जातेगाव येथील सिद्धी होळकर विजेती ठरली. तर केंदूर येथील सिद्धी शिंदे ही उपविजेती ठरली येथील. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना मानाची चांदीची गदा, दुचाकी बुलेट व रोख इनाम देत गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अविनाश संकपाळ पाटील तसेच आशिष देशमुख यांनी खूप मेहनत घेतली. दोन दिवस चाललेल्या स्पर्धेचे नियोजन चांगल्या प्रकारे केले. विजेत्यांचे परिसरामधून कौतुकाचे वर्षाव होत आहे. स्पर्धेचे उद्घाटन आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्यांना बक्षीस वितरण प्रसंगी माजी आमदार बापूसाहेब पठारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी सभापती मंगलदास बांदल, शिरूर आंबेगाव  -विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मानसिंग भैय्या पाचुंदकर, राजेंद्र जगदाळे, राहूल पाचर्णे, शेखर पाचुंदकर, शशिकांत दसगुडे, पुणे जिल्हा महिला आघाडी पोलीस पाटील संघ अध्यक्ष हर्षदाताई राहुल संकपाळ, जेजुरी देवस्थान विश्वस्त अँड अशोकराव संकपाळ, रेखाताई बांदल, पांडुरंग थोरात, घोडगंगा संचालक दादा पाटील फराटे, भाजपा तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, दौलत नाना शितोळे, सुभाष उमाप , हर्षद देशमुख, दीपक वाकचौरे उपस्थित होते . दरम्यान दिवंगत आमदार बाबुरावजी पाचर्णे समाज भूषण पुरस्कार पांडुरंग थोरात यांना देण्यात आला. माजी खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे यावेळी उपस्थित होते. स्पर्धेचे  नियोजन तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामभाऊ सासवडे, झेंडू पवार अविनाश संकपाळ पाटील, आशिष देशमुख, सरपंच सोमनाथ बेंद्रे, भाजप पदवीधर संघटनेचे अध्यक्ष महेश बेंद्रे, गणेश बेंद्रे यांनी केले होते. तर सूत्रसंचालन बाबाजी  लिमन यांनी केले. पंच म्हणून रोहिदास आमले व संदीप वांजळे यांनी काम पाहिले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *