बालेशा ज्येष्ठ नागरिक वारकरी संघाचे अध्यक्षपदी बाळासाहेब सोनवणे पाटील व उपाध्यक्षपदी मानसिंग पवार यांची निवड

145

निर्वी, ता.शिरूर (प्रतिनिधी, शकील मणियार) : शिरूर तालुक्यातील निर्वी येथील बालेशा ज्येष्ठ नागरिक वारकरी संघाच्या अध्यक्षपदी ह.भ.प. बाळासाहेब सोनवणे पाटील व उपाध्यक्षपदी ह.भ.प. मानसिंग पवार यांची निवड करण्यात आली. तसेच सचिव पदी कोंडीराम सोनवणे सर, सहसचिव नानासो पवार, कोषाध्यक्ष जयसिंग सोनवणे, सह कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे , सल्लागार शांताराम सोनवणे, बापूराव सूर्यवंशी, एकनाथ आखुटे, बबईताई मिसाळ, शालनताई आढाव यांची सदस्य पदी निवड करण्यात आली. निवडी दरम्यान हभप बाळासाहेब सोनवणे पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, ” ज्येष्ठ नागरिक वारकरी संघ प्रत्येक गावामध्ये करण्याचा मानस आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर तसेच, तहसीलचे काही कामे यासंदर्भात ज्येष्ठ नागरिकांना ज्या ज्या अडीअडचणी येत असतात त्या सोडवण्याचा मी प्रामाणिकपणे काम करणार असून, मी एक वारकरी व संगीत गायनाचार्य आहे. मी निस्वार्थ पणाने ज्येष्ठ नागरिकांची सेवा करणार असल्याचं सांगितले. या निवडीमुळे निर्वी परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *