सेंट्रल बॅंकेचे कामाकाज सुधारा अन्यथा आंदोलन – शिवबा संघटनेची मागणी

151

निघोज, ता. पारनेर(-सुभाष शेटे, कार्यकारी संपादक) : निघोज येथील सेंट्रल बॅंक संदर्भात अनेक वयोवृद्ध नागरिकांच्या तक्रारी शिवबा संघटनेच्या सहकार्याकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये नागरीकांवर ओरडणे, योग्य माहिती न देणे, पासबुक भरून न देणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. वारंवार तोंडी सुचना देण्यात येत होत्या मात्र सुधारणा झाली नाही. वयोवृद्ध नागरीकांना पेंशन किंवा संजय गांधी योजनेचे पैसे काढण्यासाठी त्रास होत असून, वयोवृद्ध चे पेंशन किंवा संजय गांधी चे पेमेंट घरपोच मिळवून देण्यासाठी शिवबा संघटना प्रयत्नशिल राहणार असल्याची माहिती शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी दिली. तसेच बँकेत कामकाजाविषयी फलक लावण्यात यावा याबाबत सुचना देण्यात आल्या. सुधारणा न झाल्यास वरिष्ठ पातळीवर तक्रार व आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेटे यांनी सांगितले. तसेच मागण्यासंदर्भातील निवेदन यावेळी देण्यात आले. यावेळी शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे, राजुभाऊ लाळगे, अशोक ढवळे, राजु लंके, बबन तनपुरे, पत्रकार भास्कर कवाद, मनोहर राऊत, संतोष देशमुख, मीनिनाथ कवाद आदि शिवबा संघटना सहकारी उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *