शिक्रापूरमध्ये स्वच्छता आभियान मोहिम संपन्न

215

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : संत निरंकारी मंडळ शिक्रापूर शाखा यांच्या अंतर्गत प्रकल्प अमृत “स्वच्छ जल, स्वच्छ मन” विद्यमान सद्गुरू सुदिक्षा माताजी व  सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या जन्म दिनानिमत्त संपूर्ण भारत “देशात स्वच्छ जल स्वच्छ मन” या अभियानांतर्गत संत निरंकारी मिशन स्वच्छता अभियान राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्रापूर शाखेतर्फे शिक्रापूर येथील स्मशानभूमी व परिसर, वेळ नदी काठ परिसर येथे स्वच्छ्ता अभियान राबवण्यात आले. तसेच संत निरंकारी, मंडळ शाखा शिक्रापूर यांच्या वतीने रक्तदान शिबिर, सरकारी दवाखाना स्वच्छ करणे असे व इतर सामाजिक कार्यक्रम वर्षभर राबवले जातात. आजच्या कार्यक्रमाला शिक्रापूर गावचे सरपंच रमेश गडदे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, जयराम सावंत, भाऊसाहेब कापरे, प्रदीप नावडे, चक्रधर भुजबळ, अरुण बेंडभर, श्याम थोरात, अरुण धुमाळ, चैतन्य गांजे, लक्ष्मण कळमकर आदी मान्यवर उपस्थित होते. सरपंच रमेश गडदे यांनी उद्घाटन करून मंडळाच्या कार्याचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *