शिक्रापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील २५ विद्यार्थी शिष्यवृती परिक्षेत झळकले  

1098

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 25 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत आले असून,या गुणवंत विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा शालेय व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थ शिक्रापूर यांच्या वतीने गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना गौरव स्वरूपात सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक, पालकांची भेट वस्तू व मार्गदर्शक शिक्षकांकडून ‘मन मे है विश्वास’ हे पुस्तक देण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब सासवडे व इतर सदस्य तसेच शिक्रापूर चे माजी उपसरपंच नवनाथ भाऊ सासवडे, माजी उपसरपंच जयश्रीताई दोरगे आणि शाळेच्या केंद्रप्रमुख रत्नमाला मोरे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय थिटे तर आभार वासुदेव टाकळकर यांनी केले. तर विद्यार्थ्यांबरोबर शाळेचे मुख्याध्यापक शैला कांबळे व दिलीप कुसाळे यांचे परिसरातून कौतुक होत आहे. या विद्यार्थ्यांकडून अंजली कोळपकर, संजया मांडगे, शुभांगी मुरुडकर, रजनी भिवरे व दत्तात्रय तांबे या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेऊन मुलांची तयारी करून घेतली व त्याचाच परिपाक म्हणून खालील पंचवीस विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये चमकले.
१) प्रतीक्षा अतुल क्षीरसागर
२) श्वेता दिगंबर लाड

३) सार्थक दिपक कवळे
४) श्रावणी जितेंद्र शिंदे

५) श्रुति शिवाजी साबळे
६)आर्यन प्रवीण नेमाडे
७) निखिल  गणेश बडे

८) रिदा मुन्ना  तांबोळी
९) गायत्री सायलू उप्पलवार
१०) मयूर मोहन  कदम
११) श्लोक परमेश्वर जगताप
१२) आर्या भाऊसाहेब उचाळे
१३) ओंकार दत्तात्रय भापकर
१४) किरण सुरेश राठोड

१५) क्षितिजा बालाजी  हरिदास
१६) वैष्णवी कुंडलिक जाधव

१७) ऋतुजा गोरख  जगताप
१८) ज्ञानेश्वरी संतोष गोरे
१९) अंजली गोरख जाधव
२०) अनुजा अप्पाराव  खपले
२१) अश्विनी मंगेश जगताप
२२) प्रणव सुभाष वाघमारे
२३) सुमित राजू आहिरे
२४) गणेश किशन मुंडे
२५) तन्मय विशाल रामगुडे




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *