पाबळ फाटा येथे वाघाच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या नऊ जणांना जामीन मंजूर

576

शिरूर, पुणे (समाजशील वृत्तसेवा) :  शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाबळ फाटा येथे वाघाच्या कातड्याची तस्करी करण्यासाठी आलेल्या नऊ जणांना शिरूर पोलिसांनी सापळा रचून मुद्देमालासह अटक केली होते. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १ कोटी रुपयाची वाघाचे कातडे व १० लाख रुपयांची दोन चार चाकी वाहने जप्त केले. या प्रकरणी अटक असलेले आरोपीना न्यायालयात प्रथम हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता,आरोपीं यांच्या वकिलांनी युक्तिवाद करून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात १) मयूर मारुती कोळेकर ( वय २२ रा.किवळे ता.खेड जि पूणे), २) विनायक सोपान केदारी ( वय ३० वर्षे रा.मंचर ता.आंबेगाव जि.पूणे ), ३) साईराज विजय गाडे ( वय २० वर्षे रा.खरपूडी राजगूरुनगर ता.खेड जि.पूणे ), ४) चिराग कैलास हांडे ( वय २६ वर्षे रा.मंचर ता.आंबेगाव जि.पूणे ), ५) कौस्तुभ महादू नायकडे ( वय -२८ वर्षे रा.मंचर ता.आंबेगाव जि.पूणे ), ६) वैभव अर्जून गाडे ( वय -२० रा. राखरपूडी राजगूरुनगर ता.खेड जि.पूणे ), ७) शिवाजी किसन कूसळकर वय -३० वर्षे रा.कडा ता.आष्टी जि.बीड, ८) अमोल बाळू राजगूरु ( वय -३४ रा.वडगाव काशिंबेग ता.आंबेगाव जि.पूणे ), ९) धनंजय जयराम पाटोळे वय -२२ रा.वडगाव पाटोळे ता.खेड जि.पूणे ) यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता पुढील चौकशी साठी ४ दिवसांची पी. सि. देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता, सरकारी वकीला मार्फत पोलिसांनी पुन्हा पी. सी. मिळावा यासाठी अर्ज केला होता. मात्र अटक आरोपी यांचे वकील अ‍ॅड.किरण रासकर यांनी सदर गुन्ह्यात पोलीस अधिकारी वा कर्मचारी यांना फिर्यादी होता येत नाही. पोलिसांनी सदर घटना ही वनविभागाला कळवणे गरजेचे होते व सदर गुन्ह्यात फिर्याद ही वनविभागाचा अधिकारी व कर्मचारी हे देऊन कारवाई होणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद केल्याने त्यांना जामीन मंजूर करण्यात आला असल्याचे अ‍ॅड.किरण रासकर व अ‍ॅड.महेश रासकर यांनी सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *