महाराजांच्या पुतळ्याच्या दर्शनी भागाजवळील असणारी शिडी त्वरित हटवावी अन्यथा आमरण उपोषण -वाघचौरे

579
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुरबाड नगरपंचायत ने महाराजांचा अश्वारूढ पुतळा 3 मार्च 2019 रोजी बसवण्यात आला असून, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. यावेळी पुतळ्याच्या दर्शनी भागाजवळच एक शिडी उभारण्यात आली आहे. सदर शिडीमुळे नागरिकांना दर्शन होताना अडचण निर्माण होत आहे. सदर बाब यापूर्वी ही नगरपंचायत चे मुख्यधिकारी परितोष कांकळ यांच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र याकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. यावेळी मुरबाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस ने नगरपंचायत विरोधात आक्रमक भूमिका घेत नगरपंचायत ला इशारा देत शिवजयंती पूर्वी दर्शनी भागी असलेली शिडी न हटविल्यास येत्या 15 फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
      राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिपक वाघचौरे यांनी शिडी हटविल्यासाठी नगरपंचायत ला 28 जानेवारी व 9 फेब्रुवारी रोजी या बाबत पत्र देऊन मागणी केली होती. मात्र याबाबत कुठली ही दखल न घेतल्याने अखेर 15 फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. मुख्यधिकारी परितोष कांकळ याबाबत ते काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत मुख्यधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता यथेच्छ कारवाई होईल असे सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *