जुन्नर येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढी ठार  

329

पिंपरी पेंढार,ता.जुन्नर (-प्रतिनिधी, अशोक डेरे) : जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील धोंडिभाऊ कारभारी चोरामले यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावर गुरुवार दि. 11 रोजी पहाटे चार वा. सुमारास बिबट्याने हल्ला करून एक मेंढी ठार केली असल्याची घटना घडली आहे. बिबट्या प्रवनक्षेत्र असलेला जुन्नर तालुका आहे. या ठिकाणी बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नेहमीच बिबट्याच्या दहशतीखाली असलेला उंब्रज, काळवाडी, पिंपरी पेंढार, पिंपळवंडी या परिसरात कायमच बिबट्यांचे हल्ले होत असतात. अशाच हल्ल्यात गुरुवार दि 11 रोजी पहाटे चार वा. च्या सुमारास सुनिल दगडु कुटे यांच्या शेतातील मेंढपाळाने आपला वाडा बसविला होता. या ठिकाणी बिबट्याने हल्ला करून मेंढी ठार केली. सदर घटनेत मेंढपाळाचे 12 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर वनखात्याचे कर्मचारी व अधिकारी एस के साळुंके, इ. पी. विभुते, बी. के. खर्गे, सुरेश गायकर, यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तर  पशुवैद्यकीय अधिकारी खिल्लारी यांनी पोस्टमार्टम केले. यापरिसरात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे त्यांचे अपघाती मृत्यूही होत आहेत. बिबट्यांचे वारंवार अपघाती मृत्यू व त्यांचे होणारे हल्ले यावर कायमस्वरूपी उपाययोजना होण्याची मागणी परिसरातली जनसामान्य नागरीकाकडून होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *