महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेने रक्तदानाचा राबवलेला उपक्रम कौतुकास्पद – माजी महापौर संजोग वाघेरे

470
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : मोशी पिंपरी चिंचवड येथील साधुराम गार्डन येथे रक्तदान शिबीराचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी विक्री संघटनेचे जिल्हाध्यक्ष चिंचवड येथील मुळ शिक्रापूरचे श्याम उर्फ बापुसाहेब गायकवाड यांनी केले. तर शिबीराचे उदघाटन पिंपरी चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे (पाटील ) यांनी केले.  यावेळी संघटनेचे संस्थापक अशोक जोशी, नगरसेविका अश्विनी जाधव, माजी नगरसेवक धंनजय आल्हाट, वंसत बोराटे, गुलाब जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन काळुराम कवितके यांनी केले. या संघटनेने प्रथमच रक्तदान शिबीराचा कार्यक्रम आयोजित केला होता. या शिबिरामध्ये २५ जणांनी रक्तदान केले. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे त्यांना सहकार्य लाभले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *