जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे यांची राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा मुख्यसंघटकपदी फेर निवड 

496

शिक्रापूर,पुणे : (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड) – शिरूर तालुक्यातील मूळ कवठे येमाई गावचे जेष्ठ पत्रकार तथा समाजशील न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक प्रा.सुभाष शेटे यांची सन २०२१-२२ साठी राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा मुख्य संघटकपदी फेर निवड करण्यात आली आहे. परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील थोरात यांनी काल दि. १३ ला लोणीकंद,पुणे येथे झालेल्या पदाधिकारी निवडीच्या विशेष बैठकीत शेटे यांची फेर निवड करण्यात आल्याचे जाहीर केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार अशोक बालगुडे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामचंद्र शिक्षण संस्थेचे लोणीकंदचे अध्यक्ष व उद्योजक मारुतीबापू भूमकर उपस्थित होते.

      यावेळी जिल्हाध्यक्ष पदी विजय लोखंडे,सुनील भंडारे,गजानन गव्हाणे व जिल्हा,तालुका कार्यकारिणी,महिला मंच पदाधिकऱ्यांच्या नव्याने नियुक्त्याही प्रदेश उपाध्यक्ष थोरात यांनी जाहीर केल्या.मागील २० वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात सामाजिकतेचे भान ठेवत कार्यरत असणारे पत्रकार सुभाष शेटे यांच्या फेरनिवडीचे संघटनेत स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील पत्रकारांचे संघटन,समस्या समजून घेत संघटन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे शेटे यांनी निवडीनंतर सांगितले.
  जेष्ठ पत्रकार सुभाष शेटे यांची राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा संघटकपदी फेर निवड झाल्याबद्दल कवठे येमाई ग्रामस्थांच्या वतीने शिरूर पंचायत समितीचे कार्यकुशल सदस्य डॉ.सुभाष पोकळे,रामदास सांडभोर,दीपक रत्नपारखी व मान्यवर्णकडून शेटे यांचा सत्कार करीत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.राज्याचे उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीपराव वळसे पाटील,शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे,आमदार अशोकबापू पवार,माजी आमदार बाबुराव पाचर्णे,शिरूर पंचायत समितीचे कार्यकुशल सदस्य डॉ. सुभाष पोकळे,राजेंद्र पोपटराव गदादे,जयवंतराव भाकरे,दत्तात्रय मुसळे,बाबाजी रासकर, कवठे येमाई ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *