पत्रकार सतीश भाकरे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन 

1509

             शिरूर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्याच्या बेट भागातील माळवाडी (टाकळी हाजी) येथील पत्रकार सतिष उर्फ रामदास सदाशिव भाकरे यांचे आज दि. १५ पहाटे एकच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.मृत्यू समयी ते ४१ वर्षांचे होते. पत्रकार योगेश भाकरे यांचे ते जेष्ठ बंधू होते. त्यांच्या पश्चात वडील,पत्नी,एक मुलगी,दोन मुले असा परिवार आहे.

पत्रकार सतीश भाकरे यांच्या आकस्मित  निधनाने भाकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.अत्यंत संयमी,शांत व प्रेमळ स्वभावाचे व सर्वांचे चाहते असलेले भाकरे यांच्या आकस्मित निधनाने त्यांच्या असंख्य मित्र परिवारास मोठाच धक्का बसला आहे. पत्रकार सतीश भाकरे यांच्या अकाली निधना बद्दल राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील,माजी आमदार पोपटराव गावडे,राज्य बळीराजा संघटनेचे पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष जयवंतराव भाकरे,निघोज बेट पत्रकार संघाचे संस्थापक दत्ता उणवणे,समाजशील न्यूज नेटवर्कचे संपादक देवकीनंदन शेटे, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा मुख्य संघटक सुभाष शेटे,मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संजय बारहाते यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *