मुरबाडमध्ये मोफत संगणक प्रशिक्षण वर्गाला तालुक्यातून उस्फुर्त प्रतिसाद

270

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड मध्ये डि.वाय. फाऊंडेशन ने सुरू केलेल्या मोफत संगणक प्रशिक्षण वर्गाला तालुक्यातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून, मुरबाड, शिवळे, सरळगाव, टोकावडे व म्हसा या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफ़त प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे. तर पहिल्या टप्प्यात 500 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाणार असून, या विद्यार्थ्यांची सहभाग ही नोंदवला आहे. डि.वाय. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी काँग्रेस पक्षाच्या मदतीने तालुक्यातील विद्यार्थ्यांना हा उपक्रम सुरू करून, तालुक्यात डि.वाय. फाऊंडेशनच्या शंभर शाखा उभारण्याचा मानस व्यक्त करून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चोरगे यांनी सांगितले. मुरबाड काँग्रेस तालुकाध्यक्ष कृष्णकांत तुपे यांना डि.वाय. फाऊंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करून काँग्रेस व डि.वाय. फाऊंडेशन संयुक्त वतीने समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे चोरगे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ सासे, योगेश पाटील, तानाजी घागस, जुबेर पठाण व मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *