पातूर तालुक्यातील चांनी पोलीस स्टेशन येथे “जागतिक महिला दिन” साजरा

409

पातूर, अकोला (-प्रतिनिधी,श्रीधर लाड) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चांनी पोलीस स्टेशन येथे 8 मार्च रोजी “जागतिक महिला दिन” साजरा करण्यात आला. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून त्याचप्रमाणे आपले कर्तव्य जगाला दाखवून देणाऱ्या आई,बहीण,पत्नी, मुलगी व मैत्रीण अश्या विविध रुपात पुरुषांच्या मागे उभ्या राहणाऱ्या आपल्या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावच्या महिला पोलीस पाटील तसेच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत महिला पोलीस कर्मचारी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतेवेळी शुभेच्छा देतांना स्त्रियांच्या हिताची जपणूक करणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष चांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माता रमाई,अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षा लताताई चव्हाण यांनी आपल्या प्रास्तविक भाषणामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगतीची कास धरून स्त्रियांना समान हक्क मिळावे यासाठी प्रत्येक स्त्री व पुरुषांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. सदरच्या कार्यक्रमाला सर्व महिला पोलीस पाटील, महिला पोलीस कर्मचारी पूजा चौधरी, विजया चौरपगार, हेड कॉन्स्टेबल महादेव देशमुख, बिट अंमलदार आदिनाथ गाठेकर, बाळू येवले, भगवंत शिंदे, रावसाहेब बुधवंत पोलीस स्टेशनचे इतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन महिला पोलीस कर्मचारी पूजा चौधरी यांनी, तर आभार प्रदर्शन चतारी येथील पोलीस पाटील विजय सरदार यांनी केले. यावेळी मा.जिल्हाधिकारी यांच्या कोविड-19 संदर्भाच्या आदेश्याचे तंतोतंत पालन करून जागतिक महिला दिन चांनी पोलीस स्टेशनमध्ये साजरा करण्यात आला.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *