पिंपरखेडला सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे बंद घरावर चोरट्यांचा डल्ला – दागिने,साहित्य,रोकड मिळून एक लाख ३२ हजाराचा ऐवज लांबविला

666
              शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी दयानंद ढोमे यांच्या बंद घराचा दरवाजा उघडून चोरटयांनी दागिने,साहित्य,रोकड मिळून एक लाख ३२ हजाराचा ऐवज लांबविला असून याबाबत वैशाली दयानंद ढोमे यांनी शिरूर पोलिसांत रीतसर फिर्याद दाखल केली आहे.
               पिंपरखेड येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांच्या बंद असलेल्या घराचा दरवाजा अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातील टी.व्ही, कपाटातील दागिने असा १ लाख ३२  हजार रुपये चोरून नेल्याची घटना घडली.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून या घरफोडीच्या चौकशीसाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.

मिळालेल्या अधिक माहिती नुसार.पिंपरखेड – काठापूर रस्त्याच्या बाजूला सेवानिवृत्त पोलिस अधिकारी दयानंद ढोमे यांचे घर आहे.ते पुणे येथे रहात असून मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी संरक्षण भिंतीवरून आत जाऊन बंद असलेल्या घराच्या दरवाजाचे लोखंडी हत्याराने लॉक तोडले आणि घरात प्रवेश केला.चोरट्यांनी घरातील टी व्हि संच ,तसेच कपाटातील कपडे अस्ताव्यस्त करून कपाटातील दागिने  आणि ५६ हजार रुपये असा १ लाख ३२ हजारांचा ऐवज लंपास केला.दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ दयानंद ढोमे यांना घटनेची माहिती दिली.सेवानिवृत्त पोलीस अधिकारी जी.पी.दाभाडे व गावचे पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी करून पोलिसांना खबर दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली,शिरूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरुदेव काबुगडे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर,पोलिस हवालदार जनार्दन शेळके,पोलिस नाईक मंगेश थिगळे,अजित भुजबळ, ठसे तज्ञ विभागाचे पोलिस हवालदार रवी भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.गुरुवारी ( दि.११ ) रोजी पोलीस कर्मचारी एस डी.रोकडे हे श्वान पथकसह दाखल झाले. सदर श्वानाने घराच्या आत बाहेर माग काढण्याचा प्रयत्न केला.परंतु यश आले नाही.या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काबूगडे हे करत असून या चोरीचा छडा लावण्याचे आश्वास काबुगडे यांनी दिले आहे.

शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी चौकी अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये अनेक लहान मोठ्या चोरीच्या घटना वरचेवर घडत असतात परंतु सदर घटनाकडे पोलिसांकडून कर्मचारी संख्येची कमतरता असल्याचे कारण देत जाणीव पूर्वक डोळेझाक होत आहे. सामान्य जनतेच्या प्रश्नाना न्याय मिळत नसून येथील वाढते गन्हे लक्षात घेऊन येथे लवकरात लवकर टाकळीहाजी पोलिस स्टेशन होण्याची गरज आहे.
 
– जी.पी.दाभाडे
सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक 




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *