मुरबाड तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ; नियमांची होतेय पायमल्ली 

442

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यात ग्रामीण भागात तसेच नगरपंचायत हद्दीत लग्न समारंभ,अग्निसंस्कार, दशक्रिया विधी, राजकिय कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणात सुरु असून, एकट्या दुकट्या वर मास्क न वापरल्याची कारवाई होताना दिसत आहे. शहरात व ग्रामीण भागात सर्वत्र सार्वजनिक ठिकाणी गर्दी व नियमबाह्य वर्तणूक होत असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. कोरोना बधितांची संख्या जलद गतीने वाढत असताना कोरोनाची तपासणी मात्र धीम्या गतीने होत आहे. तर लसीकरण सुरू असल्याचे सांगण्यात येत असून, लवकरच कोव्हीड सेंटर सुरु ही होणार आहे. मात्र सोय जरी होणार असली तरी प्रशासनाने दुर्लक्ष केले व नागरिकांनी नियम न पाळल्यास पुन्हा एकदा मुरबाड मध्ये कोरोना वाढू शकतो. मात्र याबाबत आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड मधील जनतेला कोरोनाची नियमावली पाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र राजकीय वजन वापरूनच या नियमावलींची पायमल्ली होत असल्याचे दिसत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *