मुरबाड सरकारी कोव्हीड सेंटर अजूनही सुरू होण्याच्या प्रतीक्षेत ; मुरबाडकर चिंतेत

332

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाडमध्ये कोरोना बाधित संख्या रोज वाढत असताना उपचारासाठी सरकारी कोव्हीड सेंटर सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र कोव्हीड सेंटरसाठी कर्मचारी वर्ग उपलब्ध होत नसल्याने, अजूनही हे सेंटर सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहे. मुरबाड तालुक्यातील ग्रामीण व नगरपंचायत हद्दीत आजपर्यंत 1268 कोरोना बाधित असल्याची माहिती आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात असून, 61 जणांचा मृत्यू कोरोना मुळे झाला आहे. 6228 नागरिकांची तपासणी आरोग्य विभागाने केली असून, 4901 नागरिकांचा अहवाल  निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. तर नगरपंचायत हद्दीत 417 व ग्रामीण भागात 851 कोरोना बाधित आजपर्यंत आढळुन आले. मात्र रोज तालुक्यात बाधित आढळत असताना मुरबाड सरकारी कोव्हीड सेंटर मात्र कर्मचाऱ्यांअभावी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना वरिष्ठ पातळी हुन कोव्हीड सेंटर सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र वरिष्ठ पातळी हुन कर्मचारी प्राप्त होत नसल्याने ही प्रतीक्षा सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होत असताना, मुरबाडकरांना अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार ? हा प्रश्न भेडसावत असल्याने त्वरित कोव्हीड सेंटर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *