पुण्याचे उपजिल्हाधिकारी तथा ई -फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप एक अभ्यासु व आदर्शवत अधिकारी 

1114
          शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर तालुक्यातील मूळ जांबुत गावाचे रहिवासी व शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले पुण्याचे उपजिल्हाधिकारी तथा ई -फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप एक अभ्यासु व आदर्शवत अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्मण केली आहे. संगणकीय ७/१२,८ अ, ई-फेरफार व महसूल विभागाच्या इतर ही ऑनलाईन सुविधा राज्यातील नागरिकांसाठी उपलब्ध करून या उपक्रमातून राज्याला कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळवून देण्यात त्यांचा नक्कीच मोठा वाटा आहे.
           शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेले रामदास जगताप लहानपासूनच ध्येयवादी आहेत. जिद्द,चिकाटी,मेहनत व महत्वाकांक्षा बाळगत त्यांनी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातून एम एस्सी (कृषी) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सन १९९५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्याने त्यांची तहसिलदार म्हणून निवड झाली. जुलै १९९६ ते मार्च १९९८ या कालावधीत त्यांनी रायगड जिल्ह्यात परिविक्षाधीन तहसिलदार तसेच रोहा,उरण येथेही तहसीलदार म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली.त्यानंतर सन २००० ते २००४ दरम्यान त्यांनी सतारा कराड,पंढरपूर येथे तहसीलदार म्हणून उत्कृष्ट काम केले.त्यांची कामातील अभ्यासू व कौशल्यपूर्ण काम करण्याची हातोटी लक्षात घेता त्यांनी   उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) म्हणून सांगली येथे व त्यानंतर उपविभागीय अधिकारी म्हणून खानापूर (विटा ) जिल्हा सांगली व सातारा येथे काम पाहिले .त्यानंतर त्यांनी पुणे येथे ही रजा राखीव उपजिल्हाधिकारी म्हणून यशस्वी कार्य केले.
दरम्यान चांगल्या कामाची चांगली पावती म्हणून शासनाने त्यांची सेवा उसनवारी तत्वावर राज्य समन्वयक ई -फेरफार प्रकल्प म्हणून जमाबंदी आयुक्त कार्यालयात दि १० जानेवारी २०१७ पासून वर्ग केली. राज्यातील समस्त शेतकरी वर्गाला सातबारा व खाते उतारा तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी 7/12  संगणकीकरणाचे काम ते गेले सव्वाचार वर्षे अहोरात्र पहात आहेत. उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांची ई फेरफार प्रकल्पाच्या कामातील चुणूक पाहून राज्य शासनाने जमाबंदी आयुक्त कार्यालयात राज्य समन्वयक ई – फेरफार प्रकल्प असे पद निर्माण करून पावणेचार वर्षे प्रामाणिकपणे काम करीत असलेल्या जगताप यांची राज्य समन्वयक ई – फेरफार प्रकल्प म्हणून रीतसर नेमणूक केली.
दि.८.१०.२०२० पासून उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई-फेरफार प्रकल्प , जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे येथे रीतसर त्यांनी पदभार स्वीकारला.जगताप यांच्या रूपाने एक संयमी,अभ्यासू व कार्यतत्पर अधिकारी या पदावर आसनस्थ झाल्याने राज्यातील राज्यातील ई-फेरफार प्रकल्पा अंतर्गत असलेली कामे वेगाने मार्गी लागली आहेत.  महसूल विभागातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी  व सर्वच महसूल अधिकारी यांना येणाऱ्या अडचणी सोडवून सर्व ऑनलाईन सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी ते सतत कृतीशील व कार्यमग्न असतात. राज्यातील कुठल्याही विभागातून आलेला दूरध्वनी तत्परतेने उचलत प्रसंगी कॉलबँक करीत त्यांच्या अडचणी समजावून घेत त्या तत्परतेने मार्गी लावणारे राज्य समन्वयक,ई-फेरफार प्रकल्प रामदास जगताप यांचे कार्य नक्किच  आदर्शवत,कौतुकास्पद व प्रेरणादायी असे असून खरोखर निस्वार्थी  लोकसेवा आहे असेच म्हणावे लागेल.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *