ऑक्सिजन  व व्हेंटीलेटरची सुविधा उपलब्ध तात्काळ द्या, बेड न मिळाल्यास कोविड रुग्णांनातहसीलदार व लोकप्रतिनिधींच्या दारात नेऊन ठेवणार – संजय पाचंगे यांचा इशारा  

598

   शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यात सातत्याने वाढ होत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तालुक्यातील कोविड रुग्णांसाठी तात्काळ ऑक्सिजन व व्हेंटीलेटरची सुविधा उपलब्ध करून द्यावी नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.अन्यथा बेड न मिळाल्यास कोविड रुग्णांनातहसीलदार व लोकप्रतिनिधींच्या दारात नेऊन ठेवणार असल्याचा इशारा संजय पाचंगे यांचा इशारा संजय पाचंगे,जिल्हाध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी पूणे जिल्हा (ग्रामीण) यांनी दिला आहे. तर कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध होऊनही शिरूर तालुक्यातील कोरोना – १९ रुग्णांना वार्‍यावर सोडणाऱ्या तालुका, जिल्हा प्रशासनाचा व लोकप्रतिनिधींचा त्यांनी जाहीर निषेध केला आहे. तर पाचंगे यांच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार शिरूर तालुक्यातील कोवीड – १९ रुग्णांची एका दिवसाची संख्या ४०० च्या उंबरठ्यावर असून एकुण एक्टीव्ह रुग्णांची संख्या  सरासरी ३००० च्या पुढे असण्याची शक्यता व्यक्त करतानाच मृतांची  वाढती संख्या ही सर्वांना चिंतेचा विषय ठरत आहे. शासनाकडून आलेल्या निधीतून विलगीकरण केंद्रासाठीच खर्च होत आहे. मात्र पोस्टरबाजी करण्यात आणि लोकांची दिशाभूल करण्यात आमदार व जिल्हा परिषद सदस्य मग्न असल्याचा आरोप पाचंगे यांनी केला आहे.
तालुक्यातील कोरोनाची भयावह परिस्थिती पाहता शिरुर तालुक्यात आमदार, पंचायत समिती, जिल्हा परिषद, घोडगंगा सहकारी साखर कारखाना, शिरुर बाजार समिती यांच्या कडुन एकही ऑक्सिजनचे बेड व व्हेंटीलेटर चे बेड ची सुविधा का निर्माण केली नाही असा प्रश्न ही पाचंगे यांनी उपस्थित केला आहे.उपचाराअभावी तालुक्यातील नागरिकांचे प्राण जात आहेत. पण ना प्रशासनास फिकीर ना नेत्यांना अशी संतप्त भावना पाचंगे यांनी व्यक्त केली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *