मुरबाड मध्ये नियमावली न पाळणाऱ्यांवर होणार कडक कारवाई ; नवीन नियमावली जारी  

638
मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील 17 एप्रिल रोजी कोरोना बधितांचा अहवाल पाहताच तालुका हादरला असून, 54 बधितांची संख्या पहाता हा  आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. याची दखल घेत मुरबाड तहसीलदार, नगरपंचायत या स्थानिक प्रशासनाने त्वरीत व्यापारी वर्गाशी चर्चा करून नवी नियमावली जारी केले. याचवेळी आमदार किसन कथोरे यांनीही व्यापारी वर्गाशी चर्चा करून नव्या नियमावलीला साथ देऊन तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी आवाहन केले.
नव्या नियमावली नुसार…
  •  19 एप्रिल पासून 1 मे पर्यंत किरणा, बेकारी, भाजीपाला, फळाची दुकाने, दूध डेअरी, चिकन मटण, मासे दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • हॉटेल व रेस्टॉरंट मधील घरपोच (होम डिलीव्हरी) सकाळी 7 ते 12 वाजे पर्यंत सुरू राहतील.
  • तालुक्यातील शुक्रवारी संपूर्ण बाजार पेठ बंद राहतील.
  • तर मेडिकल स्टोअर, दवाखाने सर्व दिवशी सुरू राहतील.
या नियमावलीला न जुमाननाऱ्या दुकानदारावर कारवाई केली जाईल. दिलेल्या वेळेव्यतिरिक्त नागरिक विनाकारण फिरताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सध्या राज्यात 144 कलम लागू असून संचारबंदी असतांना ही नागरिक मोठी गर्दी करताना दिसत आहे. तर ग्रामीण भागात आजही हळदी व विवाह सोहळे जोमात सुरू आहेत. प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत असताना नागरिक परिस्थितीतुन मार्ग काढण्यासाठी रस्त्यावर येत आहे. मात्र  मुरबाड तालुका प्रशासनाने तालुक्यातील 54 हा बधितांचा उच्चांक पहाताच नवी नियमावली जारी करत नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *