शिक्रापूर येथे नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी सुरू  

337

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : कोरोना रोखण्यासाठी व नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी प्रशासन विविध उपाय योजना राबवत आहे. सरकार नागरिकांच्या सर्वेक्षणाचे काम घरोघरी करत असुन, त्यांना सहकार्य करावे असे आवाहान शिक्रापूरचे विद्यमान सरपंच रमेश गडदे यांनी केले आहे .शिक्रापूर (ता.शिरुर) येथे आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे. यावेळी सरपंच रमेश गडदे, उपसरपंच शुभाष खैरे, ग्रामविकास आधिकारी बी बी गोरे, तलाठी अविनाश जाधव, सदस्य रमेश थोरात, पोलिस पाटील ज्ञानोबा विरोळे व नागरिक उपस्थित होते. या तपासणीमध्ये तपमान, ऑक्सिजन लेवल, सर्दी, खोकला, मधुमेह, उच्च रक्तदाब, आदी तपासणी करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी या भागातुन साठ शिक्षकाची नेमणुक करण्यात आली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *