नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बार सील   

443

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर मधील मलठण फाट्यावरील बार शॉपी ने नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी  सील केले. त्या ठिकाणी चोरुन दारु देत असल्याची खबर पोलिसांना लागली. पोलिस निरिक्षक विनोद घुगे, पोलिस निरिक्षक शिवदास खाडे, सरपंच रमेश गडदे, उपसरपंच शुभाष खैरे, ग्रा.पं.सदस्य मयुर कंरजे, रमेश थोरात, पोलिस शिपाई संतोष शिंदे, प्रताप कांबळे, ब्रम्हा पोवार, अंबादास थोरे, आविनाश होळकर, लक्ष्मण शिरसकर हे घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेंव्हा बार मध्ये दोन व्यक्ती दारुची विक्री खरेदी करत असताना निदर्शनास आले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *