महानगरातील अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

398

पातूर, अकोला (-प्रतिनिधी,श्रीधर लाड) : जिल्ह्यात विविध राजकीय पक्षात कार्यरत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून आपल्या राजकीय सेवेस पुन्हा नव्या जोमाने प्रारंभ केला. स्थानीय जवाहर नगर परिसरात नुकत्याच संपन्न झालेल्या या पक्ष प्रवेश समारंभात राष्ट्रवादीचे नेते व माजी आ.हरिदास भदे यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रवादीचे युवा नेते आनंद वानखडे, पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दिनकर वाघ, माजी जि.प.सदस्य दिनकर नागे, माजी प.स.उपसभापती विजयकुमार घावट, आमित खांडेकर, प्रकाश सोनवणे, अनिल घरडे आदींच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला. यावेळी घुसर जि.प. सर्कल मधील अजय पागृत व संदेश गोपणारायन यांच्या नेतृत्वात अंकुश मोरे, आनंद पागृत, नसीम शहा, वैभव चोपडे ,ब्रिजलाल गोपणारायन,अजाबराव गोपनारायण,विनायक येलकर राहुल गोपणारायन, अभिषेक गोपनारायण, विशाल येलकर, राज प्रधान,राहुल महल्ले,विनोद अंबुस्कर आदी पदाधिकाऱ्यांनी लोकनेते शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. यावेळी माजी आ.भदे यांनी पक्षात प्रवेश घेतलेल्या विविध राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करून राष्ट्रवादी पक्षाचे ध्येयधोरणे व विचार घरा-घरात पोहोचविण्याचे आवाहन करीत उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी आनंद वानखेडे यांनी पक्षात सहभागी झालेल्या सर्व युवा पदाधिकाऱ्यांचे स्वागत करीत पक्ष संघटन जोमाने ग्रामीण व शहरी भागात पसरविण्याचे आवाहन केले. ग्रामीण परिसरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतलेल्या या सर्व युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अनेक नेत्यांनी कौतुक करीत त्यांना शुभेच्छा प्रदान केल्यात.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *