फोटो : मीना शाखा कालवा टेेेल  भागात अवर्तन पहाणी करताना सुुुहास साळवे, एस डी गुजर, प्रकाश वायसे व शेतकरी

शिरूरच्या बेट भागातील मीना कालव्यास सुटले पाणी – कडक उन्हाळ्यात शेतीसह नागरिकांना दिलासा

365
          शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील बेट भागातुन जाणा-या मीना शाखा कालव्याला पाण्याचे उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे .टेल टू हेड या पध्दतीने हे पाणी सोडण्यात आले असून ऐन कडक उन्हाच्या चटक्यात तहानलेल्या पिकांना तसेच जनावरांना कालव्याच्या पाण्याचा लाभ होणार आहे.विहीर व कुपनलिकाची खालावलेली पाणीपातळी काही प्रमाणात वाढण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
           शिरूर तालुक्यातील बेटभागातून जाणाऱ्या मीना शाखा कालव्याला सोडण्यात आलेले पाण्याचे अवर्तन शेवटच्या टोकाला पोहचले आहे.मार्च महिन्यातच कडक कडक उन्हाळ्याची चाहूल लागल्याने पुढे तापमानात मोठी वाढ झाल्याने विहीर व कूपनलिकाच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे.परिणामी कालव्याच्या पाण्यावर अवलबूंन असलेल्या शेतीतील पिकांना पाणीटंचाईची झळ बसल्याने पिके संकटात सापडली होती.वीजेचे भारनियमन,रात्रीच्या वेळी सुरु असलेला वीज पुरवठा आणि तापमानात होत असलेली वाढ यामुळे शेतकऱ्यांना पिकांची तहान भागवने अवघड झाले होते.
१० एप्रिल रोजी मीना शाखा कालव्याला पाणी सूरु झाले असून टेल टू हेड या पध्दतीने सिंचन चालू झाले आहे.पिंपरखेड,जांबुत,चांडोह,फाकटे, वडनेर व टाकळी हाजी परिसरातील पिकांना मीना शाखा कालव्याच्या पाण्याचा फायदा होणार आहे.म्हसे येथे टेलला पाणी पोहचलेल्या मीना कालवा परिसराला कुकडी पाटबंंधारे उपविभाग क्र.२ चे उपविभागिय अभियंता सुहास साळवे,टाकळीहाजी मीना शाखाप्रमुख एस.डी.गुजर,कालवा समितीचे अध्यक्ष प्रकाश वायसे यांनी भेट देऊन पहाणी केली.
चालू असलेल्या सिंचनाचा मीना शाखा कालव्यावरील २८ पाणी वापर संस्थाना होणार असून उभ्या असलेल्या कांदा,ऊस,भाजीपाला व जनावरांच्या चारा पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे.तसेच विहीर, कुपनलिकाच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.असे मीना शाखा पाणी वापर संस्थाचे अध्यक्ष प्रकाश वायसे यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *