मुंबईतीलत डबेवाल्यांकरिता मोफत सायकल ; ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांचा पुढाकार

314
मुंबई (समाजशील वृत्तसेवा) : मुंबईच्या डबेवाल्यांची संघटना ज्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स घेतली. इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांनी भारतात येऊन ज्यांचे कौतुक केले. त्या संघटनेच्या डबेवाल्यांकरिता मोफत सायकल वाटपाचा प्रातिनिधिक कार्यक्रम ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्या पुढाकाराने व संघटनेचे प्रमुख उल्हास मुके यांच्या विद्यमाने शरद पवार यांच्या निवासस्थानी संपन्न झाला.
महादू हावजी बच्चे यांनी १८९० साली मुंबईत काम करणाऱ्या सामान्यवर्गासाठी जेवणाचे डबे पोहचवण्याचा उपक्रम कुलाबा येथे सुरू केला. आजमितीस सुमारे २ लक्ष नोकरदार, कामगार, मुले यांना डबा पोहचवण्याचे कार्य ही संघटना करत आहे. वक्तशीरपणा, सातत्य, समन्वय आणि सेवाभाव ह्या गुणांचा मिलाप असणाऱ्या संघटनेकडून खूप काही शिकायला मिळते. शतकाहून अधिक काळाच्या अनुभवाची शिदोरी पाठीशी असलेल्या संघटनेची बदलत्या काळातही वृद्धी आणि समृद्धी होत राहो याकरिता डबेवाला संघटनेला शरद पवार यांनी शुभेच्छा दिल्या.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *