माळशेज घाटातील रस्ता काँक्रीटीकरणासह 10 मीटर रुंद होणार ; खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश 

418

म्हारळ ते कांबा रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणालाही मंजूरी

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : माळशेज घाटातील डांबरी अरुंद रस्ता १० मीटर रुंदीकरणासह कॉंक्रिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर म्हारळ ते कांबा रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणासाठीही निविदा काढण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांची कामे मंजूर केली असल्याची माहिती भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी दिली. तर कोरोना काळात ही या प्रलंबित मागणीला तसेच त्यांच्या  प्रयत्नाना यश मिळाले आहे. यामुळे कल्याण – माळशेज महामार्गाला अधिक गती मिळणार आहे.

कल्याण ते माळशेज घाट रस्ता हा अरुंद असून, पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याने वाहतूककोंडी होते. या पार्श्वभूमीवर खासदार कपिल पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कल्याण ते माळशेज घाट रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबरच कॉंक्रिटीकरण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्रीय रस्ते व परिवहन मार्ग मंत्रालयाने कल्याण ते माळशेज घाटपर्यंतच्या रस्त्याची कामे टप्प्या-टप्प्यात मंजूर केली आहेत. या रस्त्यासाठी खासदार कपिल पाटील यांचे  प्रयत्न सुरू होते. तर आमदार किसन कथोरे हे या महामार्गाचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण होणार असल्याचे वारंवार सांगत होते. त्यामुळे भाजपचे आमदार व खासदार यांच्या मागणी ला यश आहे आहे.
माळशेज घाटात सध्या ७ मीटर रुंद रस्ता आहे. तो आता १० मीटर रुंद केला जाणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण डांबरी रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यात येईल. या रस्त्यासाठी ११५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तर प्रत्यक्ष कामाला पावसाळ्यानंतर सुरूवात होणार आहे. सध्या सावर्णे ते माळशेज दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी ९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अशी माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली. कल्याण-मुरबाड मार्गावरील म्हारळ ते कांबा दरम्यानही पावसाळ्यात कोंडी होते. या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणालाही मंजूरी मिळाली आहे. या कामासाठी ४६ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली. त्यांच्या मागणीच्या यशा नंतर कल्याण – मुरबाड रेल्वे 2024 पर्यत धावेल या मागणीला यश येवो अशी प्रतिक्रिया आदिवासी नेते राजाभाऊ सरनोबत यांनी दिली. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी 3 मार्च 2019 रोजी मुरबाड कल्याण रेल्वे चे डिजिटल उद्घाटन केले होते.  त्यामुळे हा शुभारंभ लवकर होऊन खासदार पाटील यांची रेल्वेच्या मागणीला ही यश मिळो अश्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.

र्गाला अधिक गती मिळणार आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *