कवठे येमाई येथे येस क्लबच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न ; तब्बल ६७ रक्तदात्यांनी केले रक्तदान

532

शिरूर, पुणे (-देवकीनंदन शेटे, संपादक) : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे येस क्लबच्या वतीने तसेच आधार ब्लड बँक, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच ग्रामपंचायत कवठे येमाई यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात कोरोनाच्या या काळात तब्बल ६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. “रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” असे समजले जाते. शहरातीलविविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. संपूर्ण जगावर घोंगावत असलेल्या कोरोनारूपी संकटामुळे या रक्तदान शिबिरांना अनन्यसाधारण महत्व आले आहे. या शिबिराचे उदघाटन शिरूर पंचायत समितीचे कार्यकुशल सदस्य डॉ.सुभाष पोकळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच मंगलताई सांडभोर, उपसरपंच निखिल घोडे, ग्रा.पं. सदस्य प्रविण बाफना, चित्रपट लेखक मोहन पडवळ, रामदास सांडभोर, सुदामभाऊ इचके यांची विशेष उपस्थिती लाभली. तर या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल माजी सरपंच दीपक रत्नपारखी यांनी शिबिरास भेट देऊन समाधान व्यक्त केले.  

०१ मे २०२१ पासून १८ वर्षांपुढील सर्वांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार असून, कोरोनाची लस घेतल्यानंतर त्या पुढील २८ दिवस रक्तदान करता येणार नसल्याने हे शिबीर राबवत असल्याचे येस क्लबचे उपाध्यक्ष डॉ.संतोष उचाळे यांनी सांगितले. तर दि. २३ रोजी पार पडलेल्या भव्य रक्तदान शिबिराला रक्तदात्यांची दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आणि या राष्ट्र सेवेच्या महान कार्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल येस क्लबचे अध्यक्ष नवनाथ सांडभोर यांनी आभार मानले. तर शिबिराचा समारोप करताना माजी पंचायत समिती सदस्य सुदामभाऊ इचके यांनी सर्वांचे आभार मानले. सदर शिबिरासाठी येस क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सर्व रक्तदात्यांचे व आयोजकांचे समाजशील न्यूज नेटवर्क च्या वतीने अभिनंदन !
१)गणपत भिकाजी सांडभोर
२)मोहन एकनाथ पडवळ
३)दत्तात्रय म्हतारबा भोर
४)शरद सुभाष घोडे
५)नवनाथ साहेबराव इचके
६)संदिप कारभारी इचके
७)सुरेश साहेबराव पोकळे
८)ऋतिक आशोक हिलाळ
९)गणेश कारभारी हिलाळ
१०)शुभम संतोष गायकवाड
११)सुनिल घोडे
१२)तेजस मिलिद काळे
१३)ज्ञानेश्वर सुभाष गिरी
१४)गणेश दत्तात्रय उचाळे
१५)अभिजीत भास्कर घोडे
१६)राकेश दिलीप बोरा
१७)विठ्ठल रामदास मुंजाळ
१८)सुरेश आनंदा रोहिले
१९)महेद्र दगडु सांडभोर
२०)गोरक्ष लक्ष्मण पोळ
२१)पवन सदाशिव जाधव
२२)रामचंद्र राजगुडे
२३)निलेश बाळासाहेब डांगे
२४)योगेश नानाभाऊ जाधव
२५)योगेश बारकु गावडे
२६)शंकर रामदास शिंदे
२७)सतिश जिजाबा पोकळे
२८)विकास आनंदराव कांदळकर
२९)योगेश भानुदास पोकळे
३०)पांडुरंग सुरेश भोर
३१)रामदास मेरगळ
३२)भुपेंद्र भाऊसाहेब चौधरी
३३)नवनाथ सुखदेव सांडभोर
३४)सौ.रुपाली मोहन पडवळ
३५)लहु लक्षण पोळ
३६)सुदर्शन लहु वागदरे
३७)स्वप्निल बबन वागदरे
३८)गुलाब देवराम इचके
३९)गोपीनाथ गंगाराम रायकर
४०)विनायक सुखराज गिरी
४१)सुरेश बबनराव गायकवाड
४२)सोपान गोविद वागदरे
४३)राजेद्र पांडुरंग इचके
४४)निखिल संतोष घोडे
४५)सोनभाऊ हिरामण पोकळे
४६)कैलास कांताराम पोकळे
४७)निलेश बबन पोकळे
४८)संदिप बापु वागदरे
४९)दिपक एकनाथ सांडभोर
५०)देवराम पुंडलिग लंके
५१)सागर लहु वागदरे
५२)डॉ.संतोष बबन उचाळे
५३)संतोष हरिभाऊ साळवे
५४)विलास कोंडिभाऊ सालकर
५५) चांद नुरमहमंद पठाण
५६)ऋषीकेश विकास शेटे
५७)अतुल बबनराव कुलथे
५८) अनिल सुभाष वागदरे
५९)भानुदास सोपान वागदरे
६०) संपत सुखदेव पोकळे
६१)तुषार चंद्रकांत शिंदे
६२)कमेश दिलीप बोरा
६३)सागर किसन बोर्हाडे
६४)रविंद्र  ज्ञानदेव नवले
६५) दिपकभाऊ माधवराव रत्नपारखी
६६)खंडु देवराम वागदरे
६७) संपतराव आनंदराव कांदळकर



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *