पुणे जिल्ह्यात कोरोना स्टेपडाऊन प्रोटोकॉलच्या अंमलबजावणीचा मुद्दा महत्वपूर्ण – खा.डॉ.अमोल कोल्हे 

1142
         शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) –  पुणे जिल्ह्यातील कोविड-१९  स्टेपडाऊन प्रोटोकॉलच्या अंमलबजावणीचा मुद्दा महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. ते आज पुण्यात झालेल्या कोविड १९ चा प्रादुर्भाव व उपाययोजना यांचा आढावा बैठकीत बोलत होते. ही बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत खासदार डॉ.कोल्हे यांनी कोरोना स्टेपडाऊन प्रोटोकॉलच्या अंमलबजावणीचा मुद्दा मांडला. यासोबतच ग्रामीण भागात डीसीएचसी मंजूरी बाबतचे तांत्रिक मुद्दे उपस्थित केले.
        दुसऱ्या लाटेत रुग्ण ३-४ दिवसात अचानक अत्यवस्थ होण्याचे प्रमाण लक्षात घेता ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड वाढविण्याची अधिक गरज आहे, याकडे डॉ.कोल्हे यांनी लक्ष वेधले. सादरीकरणातील व्हेंटिलेटर बेडची संख्या व प्राप्त माहिती यांची सांगड घालण्याची गरज असल्याचे ही त्यांनी यावेळी नमूद केले.
भविष्यातील वाढणारी रुग्णसंख्या विचारात घेऊन नियोजन करण्याची गरज असल्याचे मत देखील खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी या बैठकीत मांडले. या बैठकीला खा.गिरीश बापट, आ.चेतन दादा तुपे, आ.अतुल बेनके,आ. सुनील टिंगरे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
याशिवाय या बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार चोक्कलिंगम,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व आरोग्य विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी देखील या बैठकीला उपस्थित होते.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *