प्रदीपदादा वळसे पाटील यांचेकडून पुन्हा तत्परता – कवठे येमाईतील २ कोरोनाग्रस्तांना मिळाले तात्काळ उपचार

1888

    शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) -देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे हाहाकार मजला आहे.पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यातील परिस्थितीही काही वेगळी नाही.हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात व अडचणीच्या काळात कुणाचा आधार,मदत मिळणे दुरापास्त होत चाललेले असताना शिरूर  तालुक्यातील कवठे येमाईचे सुभाष उघडे व दत्ता घोडे हे कोविड पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्यावर त्यांना तात्काळ उपचार मिळणे गरजेचे असताना पुन्हा एकदा भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक प्रदीपदादा वळसे पाटील यांचेकडून या दोघांना तात्काळ औषध,उपचार मिळण्याकामी मदत झाल्याने प्रदीपदादांकडून माणुसकीचे दर्शन पाहावयास मिळाले.तात्काळ उपचार मिळाल्याने या दोन्ही रुग्णांची तब्येत आता चांगलीच सुधारली आहे. या आधी ही जुन्नर तालुक्यातील एका कोरोनाग्रस्ताला प्रदीपदादांनी उपचारासाठी तात्काळ मदत मिळवून दिली होती.
कवठे येमाईचे सुभाष उघडे व दत्ता घोडे यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव आला त्यांना तात्काळ उपचाराची गरज होती.कोरोनाच्या या मोठ्या संकटात रुग्णांना बेड,ऑक्सिजन,अत्यावश्यक उपचार मिळणे अवघड झालेले असताना उघडे व घोडे कुटुंब काळजीत पडले होते.काय करावं काय नाही हे सुचत नव्हत. याच वेळी माजी ग्रामपंचायत सदस्य बाजीराव उघडे यांनी तात्काळ प्रदीपदादा वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधत मदतीची गरज व्यक्त केली. अडचणीच्या वेळी नेहमीच भक्कम उभे राहणा-या प्रदीप दादांनी तात्काळ शिरूरला संपर्क करून परिस्थिती समजून घेत या २ ही रुग्नांना अत्यावश्यक ती मदत वेळीच मिळवून दिली. वेळेत व तात्काळ योग्य ते औषध उपचार मिळाल्याने दत्ता घोडे व सुभाष उघडे यांची तब्येत चांगली सुधारली.प्रदीप दादांनी देखील अनेक वेळा स्थानिकांशी फोनवर संपर्क करून या २ ही रुग्णांची तब्येत कशी आहे याची विचारपुस केली.याकामी माजी आमदार पोपटराव गावडे,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे,मानसिंगभैय्या पाचुंदकर पाटील यांची देखील मोलाची मदत झाल्याचे बाजीराव उघडे यांनी सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *