मुरबाड मधील कोव्हीड रुग्णालयात ऑक्सिजन साठा संपला ; रुग्णालयासह रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ

299

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड मधील खाजगी कोव्हीड सेंटर व ग्रामीण रुग्णालय परिसरात सुरू केलेल्या शासकीय कोविड केअर सेंटर मधील ऑक्सिजन साठा संपला असल्याने रुग्णालयासह रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू झाली आहे. मुरबाड औद्योगिक वसाहतीमधील एका ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या कंपनी कडून मुरबाड येथील रुग्णालयात रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा केला जाईल असे आश्वासन मिळाले होते. परंतु प्रत्यक्षात येथे ऑक्सिजन मिळत नसल्याचे आरपीआय ठाणे जिल्हा नेते रवींद्र चंदने यांनी सांगितले. शासकीय कोविड सेंटरसाठी काल रविवारी ऑक्सिजन सिलेंडर घेण्यासाठी गाडी पाठविली असता अंबरनाथ व डोंबिवली येथे ऑक्सिजन न मिळाल्याने ही गाडी परत आली असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.संजय वाठोरे यांनी दिली. सध्या येथे 42 रुग्ण उपचार घेत आहेत. याबाबत तहसिलदार अमोल कदम यांना विचारले असता मुरबाड येथील शासकीय कोविड केअर सेंटरसाठी सिव्हील हॉस्पिटल ठाणे येथून तातडीने दहा ऑक्सिजन सिलेंडर येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तर खाजगी कोव्हीड हॉस्पिटल चालवणारे डॉ.पष्टे यांना ऑक्सीजन बाबत विचारणा केली असता मुरबाड मधील ऑक्सीजन तयार करणाऱ्या कंपनी आमदार किसन कथोरे यांना दिलेले आश्वासना नुसार साठा मिळाला मात्र तो संपल्याने आता आम्हाला मिळेल तेथून, मिळेल त्या भावात रुग्णासाठी उपलब्ध करावा लागत असून, मुरबाड मधील ऑक्सीजन तयार करणारी कंपनीच्या अनेक अटी व तांत्रिक बाबी पूर्ण करणे या परिस्थितीत तात्काळ शक्य नसल्याने आम्हाला ऑक्सीजनसाठी भटकावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुरबाडमध्ये ऑक्सीजन तयार होऊनही रुग्णालयासह रुग्णांना धावपळ करावी लागत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *