नारळांच्या झाडावर वीज पडल्याने २ झाडे पेटली – साताऱ्याच्या गुरुवार पेठेतील घटना 

522

   सातारा : (सा.समाजशील वृत्तसेवा) – सातारा शहरात काल गुरुवारी दि.२९ ला सायंकाळी जोरदार वादळी वारे व गडगडाटासह पाऊस कोसळला. यावेळी साताऱ्याच्या गुरुवार पेठेत असणाऱ्या २ नारळांच्या उंच झाडांवर वीज पडल्याने त्या झाडांनी तात्काळ पेट घेतला.घटना स्थळा जवळच राहणारे देवदत्त शेटे,सुरेखा शेटे यांनी काही दृश्ये आपल्या मोबाईलने टिपलीत.  तर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पालिकेच्या अग्निशामक दलाने घटना स्थळी दाखल होत ही आग वीझवलीय. या घटनेत कुठलीही अघटीत घटना घडली नसली तरी वीज पडल्याने परिसरातील अनेकांचे सेट टॉप बॉक्स बंद पडल्याची माहिती मिळाली. सध्याची कोरोनाची भयावह परिस्थिती त्यात सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी घरीच सुरक्षित राहण्याची गरज सुजाण नागरिकांतून व्यक्त होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *