शिरूर शहरात आज कोरोनाचे नवीन २२ रुग्ण – नागरिकांनी सूचनांचे पालन करावे – मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन 

363

शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर शहरात आज शुक्रवार दि. ३० ला २२ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून नगर परिषद प्रशासन वारंवार देत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना व सूचनांचे नागरिकांनी पालन करावे,आपण आपले कुटुंब संसर्गापासून दूर राहण्याकामी दक्षता घ्यावी असे आवाहन शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.  शिरूर शहरात जरी आज नवीन २२ रुग्न आढळून आले असले तरी आज एक ही रुग्ण दगावलेला नाही. आज पर्यंत ३१ कोरोना बाधित रुग्णांचा शहरात मृत्यू झाल्याचे ही रोकडे यांनी सांगितले.दरम्यान शहरातील विविध रुग्णालयात,कोविड सेंटरला २८५ रुग्नांवर उपचार सुरु असून १३१ रुग्ण गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.सीसीसी रुग्ण संख्या १४७ असून प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये ७ जण उपचार घेत असल्याचे व आज ३२ रुग्ण बरे झाल्याचे ही रोकडे यांनी सांगितले.शिरूरच्या चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात सुरु केलेल्या कोविड सेंटर मध्ये ४७ बेड उपलब्ध बेड उपलब्ध असल्याचे ही त्यांनी सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *