खा.डॉ.अमोल कोल्हे व आ.अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेञ तपासणी शिबीराचे आयोजन

342
शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिरुर लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे व शिरुर हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेञ तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले .एच व्ही नेञ रुग्णालय हाडपसर महमंदवाडी, राव लक्ष्मी ट्रस्ट, राष्टवादी काँग्रेस पक्ष शिक्रापूर ग्रामपंचायत यांच्या सयुंक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात अंदाजे ७०० पेक्षा जास्त नागरिकांनी शिबीराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सुञसंचालन पश्चिम महाराष्ट्र समता परिषदेचे संघटक सोमनाथ भुजबळ यानी केले. यावेळी जि.प सदस्या कुसुम मांढरे, सणसवाडीचे पंडीत दरेकर, रांजेद्र नरवडे, राजेंद्र जगदाळे, विद्यमान सरपंच रमेश गडदे, उपसरपंच रमेश थोरात, माजी सरपंच हेमंत कंरजे, माजी उपसरपंच शुभाष खैरे, पुजा भुजबळ,  राष्टवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल गायकवाड, रविद्र पाटील, सारिका सासवडे, मोहिनी मांढरे, विशाल खरपुडे,  विठ्ठल सोंडे, शाळेचे मुख्यध्यापक दताञय तांबे, पोलिस निरिक्षक हेमंत शेडगे तसेच नेञतज्ञ डॉ. शरद शिंदे, अविनाश आडके, नितीन वाघमारे व  अन्य डॉक्टर उपस्थित होते. पवार आपल्या भाषणात म्हणाले की, अशी शिबीर वारंवार होणे गरजेची असुन, या शिबीराच्या माध्यमातुन अनेकांना याचा फायदा होतो. कार्यक्रमाचे आभार माजी उपसरपंच शुभाष खैरे यांनी मानले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *