गोंदिया शहराच्या भुमिगत विद्युत प्रकल्पासाठी १४२.७५ कोटीच्या प्रस्तावाला मंजूरी

418

गोंदिया शहराच्या भुमिगत विद्युत प्रकल्पासाठी १४२.७५ कोटीच्या प्रस्तावाला मंजूरी
           देवरी,गोंदिया : (प्रतिनिधी,शैलेश राजनकर)  –  पुर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा व नागपूर या तिन्ही जिल्ह्यातील भुमिगत विद्युत प्रकल्पाचे प्रस्ताव सन २०२०-२१ या वर्षाच्या अधिवेशनात मांडण्यात आले होते. दरम्यान सदर कामास प्रशासकीय मान्यता व निधी वितरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यासाठी खा.प्रफुल्ल पटेल यांनी सातत्याने राज्य शासन व  उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे  पाठपुरावा केला. राज्य सरकारच्या ऊर्जा व कामगार विभागाने गोंदिया शहराच्या १४२.७५ कोटी खर्चाच्या भुमिगत विद्युत वाहिनीच्या प्रकल्प अहवालाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे लवकरच गोंदिया शहरातील भुमिगत विद्युत प्रकल्पाची कामे सुरू होणार आहे. हे खा.प्रफुल्ल पटेल यांच्या सतत पाठपुराव्याचे फलित असून शहराच्या विकास शृंखलेत आणखी एका प्रकल्पाची भर पडली आहे.  या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा विशेष सहकार्य लाभले आहे.
गोंदिया शहरातील विद्युत वाहिन्यांचे भुमिगत विद्युत वाहिन्यांमध्ये रूपांतर करणे तसेच उपकेंद्र रोहित्राच्या संख्येत वाढ करणे, नविन उच्चदाब उपकेंद्र स्थापित करणे, नविन वितरण रोहित्र बसविणे, वितरण रोहित्रांची क्षमता वाढविणे अशा आदि कामांसाठी महावितरण कंपनीने १४२.७५ कोटी इतका निधी उपलब्ध करुन देण्याचे विनंती केली होती. हे सन २०२०-२१ व सन २०२२ च्या अर्थसंकल्पात मांडण्यात आले होते. दरम्यान गोंदियाच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता व निधी वितरणाची बाब शासन विचाराधीन होती. राज्याच्या विद्युत मंत्रालयाने गोंदिया शहराच्या भुमिगत विद्युत प्रकल्पाकरीता १४२.७५ कोटीच्या खर्चाचा सविस्तर प्रकल्प अहवालाला प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. खा.प्रफुल्ल पटेल यांनी राज्य सरकारकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास अखेर यश मिळाल्याने या प्रकल्पाचे काम मार्गी लागणार आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *