जांबूतच्या अनिता सुदाम जगताप यांचे कोरोनाने निधन 

1708

जांबूतच्या अनिता सुदाम जगताप यांचे कोरोनाने निधन

        जांबुत,शिरूर : (सा.समाजशील वृत्तसेवा) –  शिरूर तालुक्यातील जांबूतच्या जय मल्हार हायस्कुल मधील शिक्षक सुदाम देवराम जगताप यांच्या पत्नी सौ.अनिता सुदाम जगताप यांचे आज दि. १६ ला पहाटे कोरोनाने निधन झाले असल्याची माहिती सुदाम जगताप  यांनी दिली. मृत्यूसमयी त्या ४१ वर्षे वयाच्या होत्या.अत्यंत शांत स्वभाव, मितभाषी, सर्वांशी प्रेमाने बोलणाऱ्या व सर्वांचे नेहमी आदरातिथ्य करणाऱ्या अशा अनिताताईंच्या अकाली निधनाने जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून जगताप परिवारात कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची २ मुले अंकिता आणि अनुज यांच मातृछत्र हरपल आहे.त्यांच्या निधनाबद्दल जांबुत ग्रामस्थ व परिसरातून शोक व्यक्त होत असून हळहळ व्यक्त होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *