मासे पकडण्यासाठी नदीकाठी लावलेल्या करंटने युवकाचा मृत्यू ?

547

देवरी, गोंदिया (-प्रतिनिधी, शैलेश राजनकर) : देवरी तालुक्यातील ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या भोयरटोला (शिलापुर) गावातील युवक विलास हा नदी काठी मासे पकडण्यासाठी गेला असता त्या ठीकाणी मासे पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या करंटने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिलापुर गावाला लागुन बाघनदीचा प्रवाह वाहत आहे. त्या परीसरातील गावातील काही लोक आपली उपजीविका भागवण्यासाठी मासे पकडण्याच्या उद्देशाने त्या नदिवर जात असतात. त्यातच म्रुत विलास वट्टी हा पण दि. १४ मे रोज शुक्रवारी  सकाळच्या सुमारास (९.३० वा.) घरुन मासे पकडण्यासाठी गेला असता, दुपारी परत न आल्याने घरच्या लोकानीं त्याचा नदी परीसरात शोध सुरु केला. त्यावेळी तो नदीच्या काठी म्रुत अवसस्थेत पडुन असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या अगांचा रगं काळा पडल्याने, त्याचा मृत्यू हा मासे पकडण्यासाठी नदीकाठी लावलेल्या करंटने झाला असावा असा प्राथमिक अंदाज तिथे जमलेल्या नागरिकांनी केला, तर सदर घटनेची नोंद देवरी पोलीस्टेशनला करण्यात आली आहे. तर या युवाकाच्या पाठीमागे त्याची पत्नी, मुलगा-मुलगी, लहान भाऊ, आई असा  परिवार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार सदर मृत व्यक्तीला देवरी येथील शव-विच्छदेनासाठी पाठविले असून, या घटनेचा तपास देवरी पोलीस्टेसनचे थानेदार सिगंनजुडे यांच्या  मार्गदर्शनात पोलिस नायक गायधने करीत आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *